बंद
    • जिल्हा न्यायालय, भंडारा
    • जिल्हा न्यायालय, भंडारा
    • जिल्हा न्यायालय, भंडारा

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    भंडारा जिल्हा हा पूर्वीच्या मध्य प्रांताचा आणि बेरारचा एक भाग होता. नंतर ३१.१०.१९५६ पर्यंत तो मध्य प्रदेश राज्याचा एक भाग होता. ०१.११.१९५६ पासून ते ३०.०४.१९६० पर्यंत मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट होते. १ मे १९६० पासून जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करण्यात आला आणि ०१.०४.१९५९ पासून स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. १९५९ पूर्वी भंडारा न्यायिक जिल्हा मध्य प्रदेश राज्यातील नागपूर न्यायिक जिल्ह्याला जोडण्यात आला होता.

    भंडारा - जिल्हा व सत्र न्यायालय, भंडारा १९२२-२३ पासून जुन्या न्यायालयाच्या इमारतीत कार्यरत आहे. नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या विस्ताराचे उद्घाटन १९८५ रोजी झाले. A.D.R. १२.१०.२०१९ रोजी इमारतीचे उद्घाटन झाले आणि १० जुलै २०२१ रोजी ई-सेवा केंद्राचे उद्घाटन झाले.

    1. साकोली- साकोली येथील दिवाणी न्यायालय इमारतीचे उद्घाटन एप्रिल १९८८ रोजी झाले.
    2. तुमसर- तुमसर येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन २३.०४.२०११ रोजी झाले.
    3. लाखांदूर- लाखांदूर येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन २१.०८.२०११ रोजी झाले.
    4. पवनी- पवनी येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन २६.११.२००५ रोजी झाले.
    5. मोहाडी- मोहाडी येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन ०४.०१.२०१५ रोजी करण्यात आले.
    अधिक वाचा
    CJ
    मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश माननीय श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
    Gaurdian Judge
    माननीय पालक न्यायाधीश माननीय श्री. ए.एल. पानसरे

    भंडारा न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथील न्यायाधीश.

    Photo_01727
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा माननीय श्री. आर.जी. अस्मर

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा